खानापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे आदेश

आगामी विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत प्रत्येक पक्षाची जोरदार मोर्चेबांधणी सुरू असलेली पहायला मिळत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने खानापूर विधानसभा मतदारसंघाची मागणीच केली नाही.

या मतदारसंघावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा नैसर्गिक हक्क आहे. त्यामुळे खानापूर विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे लढविणार आहेत आमच्या पक्षाचा आमदार व्हावा या विचारधारेतून निष्ठावंत कार्यकर्ता आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा जिल्हा प्रमुख संजय विभुते यांनी पत्रकार परिषदेत केलेली आहे.

शिंदे गटाविरुद्ध एकास एक लढत व्हावी यासाठी मी मतदार संघातील माजी आमदार सदाशिवराव पाटील, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, वैभव पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केलेली आहे. त्यांना आपण एक महिन्यात विचार करून सांगा असेही सांगितले होते.

मात्र अद्याप त्यांचा निर्णय झालेला नाही त्यामुळे भास्कर जाधव यांच्या आदेशानुसार मी निवडणूक लढविण्याच्या तयारीला लागलोय शिवसेनेची मशाल ताकतीने पेटेल पितृपंधरवडा झाल्यानंतर मतदार संघाचा गावनिहाय दौरा करून जनतेशी संवाद साधून भूमिका मांडणार असल्याचे यावेळी संजय विभुते यांनी स्पष्ट केले.