महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचा हप्ता २९ सप्टेंबर रोजी दिला जाणार आहे.त्यामुळे राज्यातील महिला खूप आनंदाच आहे. त्याचसोबत आता पीएम सन्मान निधी योजनेचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे.पीएम सन्मान निधी योजनेचा हप्ता ५ ऑक्टोबर २०२४ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर ही माहिती देण्यात आली आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना चार महिन्यांनी २००० रुपये मिळतात.दर वर्षाला ६ हजार रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटला दिले जातात. अप्रिल-जुलै, ऑगस्ट-नोव्हेंबर आणि डिसेंबर-मार्च या कालावधीत शेतकऱ्यांच्या अकाउंटला पैसे जमा होतात.