महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूपच प्रसिद्ध आणि महत्त्वाची अशी योजना असून या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांच्या खात्यावर प्रति महिना पंधराशे रुपये जमा केले जातात.आतापर्यंत जर या योजनेची स्थिती बघितली तर जवळपास 7500 रुपये या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत.
तसेच विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अडकू नये याकरिता ऑक्टोबर महिन्यातच दोन्ही महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आले होते. परंतु आता राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्यावर नवीन सरकार स्थापन झाले आहे व महत्वाचे म्हणजे या सरकारचे कामकाज देखील आता सुरू झाले असून मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खाते वाटप देखील करण्यात आले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मात्र आता डिसेंबर महिन्याचा हप्ता बँकेत कधी जमा होणार याकडे मात्र लाडक्या बहिणीचे लक्ष लागून राहिले आहे.
नुकतेच पार पडलेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती देताना सांगितले की, डिसेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो हे अधिवेशन संपल्यावर देण्यात येईल अशा प्रकारची ग्वाहीच त्यांनी दिली.
21 डिसेंबर 2024 रोजी नागपूर येथे सुरू असलेले विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपले व आता देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच बऱ्याच प्राप्त अर्जांची छाननी ही विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे बाकी होती. आता या निवडणुकांची सगळी प्रक्रिया पार पडली आहे व आता या योजनेचे जे काही अर्ज प्रलंबित आहे त्यांची छाननी आता पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
यामध्ये ज्यांनी अर्ज केलेले आहेत परंतु त्यांना अजून पर्यंत या योजनेचा लाभ मिळालेला नाही अशांनी त्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक आहे की नाही हे पाहणे गरजेचे आहे. तुमचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असेल तरच या योजनेचे पैसे मिळू शकणार आहेत. त्यामुळे बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य आहे.
बँक खात्यासोबत आधार कार्ड लिंक आहे की नाही हे अशा पद्धतीने तपासा
1- बँक खात्यासोबत आधार कार्ड लिंक आहे की नाही हे तपासण्या करतात तुम्ही सगळ्यात अगोदर https://uidai.gov.in या लिंक वर क्लिक करावे.
त्यानंतर आधार लिंकिंग स्टेटस यावर क्लिक करावे.
3- त्यानंतर बँक सीडींग स्टेटस हा एक पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करावे.
4- त्यानंतर तुमचा आधार नंबर आणि कॅपच्या कोड इंटर करावा आणि आलेल्या ओटीपीच्या साह्याने लॉगिन करा.
5- त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आधार कार्ड सोबत तुमचे कोणते बँकेचे खाते लिंक आहे याची माहिती दिसून येते.
6- परंतु जर अर्जासोबत दिलेले बँक खाते त्यामध्ये आले नसेल तर बँकेत भेट देऊन बँक खात्यासोबत आधार कार्ड लिंक करून घ्यावे.