IPL 2025 Auction : मुंबई इंडियन्सला 440 व्होल्टचा धक्का! IPL मेगा लिलावपूर्वी बुमराहने सोडली संघाची साथ

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 साठी मेगा लिलाव नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला होईल, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI)च्या सूत्रांनी सांगितले आहे.त्यासाठी काही दिवसांत बीसीसीआयकडून याबाबतचे नियम आणि कायदे जारी केले जातील. दरम्यान, मुंबई इंडियन्स संघाकडून एक मोठी बातमी समोर येत आहे, ज्यामध्ये एक खास खेळाडू संघ सोडून दुसऱ्या संघात सामील होऊ शकतो.

याआधी सूर्यकुमार यादव आणि माजी कर्णधार रोहित शर्मा संघ सोडत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. असे झाल्यास मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का असू शकतो.नुकत्याच आलेल्या एका अहवालात अशी बातमी समोर येत आहे की, टीमचा सर्वात अनुभवी आणि सामना जिंकणारा गोलंदाज जसप्रीत बुमराह आता मुंबई इंडियन्सला अलविदा करू शकतो.

खरंतर, असे झाल्यास मुंबई इंडियन्ससाठी हा आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का असू शकतो. बुमराह त्याच्या आयपीएल कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच मुंबई फ्रँचायझीसोबत आहे आणि जर तो इतर कोणत्याही संघात गेला. तर पाच वेळा चॅम्पियन संघाला त्याची जागा शोधणे खूप कठीण होणार आहे.