हातकणंगले तालुक्यातील किनी येथील राज्य परिवहन विभागाची मुक्काम एसटी बस बंद केल्याने विद्यार्थ्यांना सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान दोन किलोमीटरची पायपीट करून कॉलेजला जाण्यासाठी एसटी पकडावी लागत असल्याने विद्यार्थ्यांची खूपच दमछाक होत आहे. मुक्कामची एसटी बस तात्काळ सुरू करावी अशी मागणी सध्या विद्यार्थी आणि प्रवासी वर्गातून जोर धरू लागलेली आहे.
किणी मुक्काम बससेवा सुरू करण्याची विद्यार्थी आणि प्रवासी वर्गातून मागणी!
