जयंत पाटील कार्यकर्त्यांवर संतापले! शिवस्वराज्य यात्रेत गोंधळ

आगामी विधानसभेच्या अनुषंगाने राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाने शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन केले. गुरुवारी अकोल्यात ही यात्रा पोहोचली. यावेळी आयोजित सभेत सर्व कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या उमेदवाराचे नाव घोषित करण्याचा आग्रह धरला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भाषणाच्यावेळी हा गोंधळ झाल्याने जयंत पाटील चांगलेच संतापलेले दिसले. उमेडवरच्या नावसाठी गोंधळ सुरू झाल्याने जयंत पाटलांनी आपलं भाषण सोडून काढता पाय घेतला. त्यामुळे काही काळ वातावरण तापले होते.

नंतर असा पोरकटपणा केलेला चालणार नाही. शिस्त पाळा अशी सूचना यावेळी जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिली आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील चांगलेच संतापलेले दिसून आले आहेत. अकोल्यात शिवस्वराज्य यात्रेवेळी आयोजित सभेत जयंत पाटील यांचं भाषण सुरू असताना ‘उमेदवाराचं नाव जाहीर करा’ म्हणून कार्यकर्त्यांनी आग्रह केलायावेळी जयंत पाटील यांनी भाषण अर्धवट सोडून निघालेले दिसले.