सांगोल्यात अटीतटीच्या व चुरशीच्या लढाईत कोण जिंकणार सर्वांनाच लागली उत्सुकता

आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची काल सांगता झाली. 20 नोव्हेंबर म्हणजे उद्या बुधवारी विधानसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघांमध्ये निवडणुकीची तयारी जवळजवळ पूर्ण झालेली आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघात आजपर्यंत दुरंगी लढतीचा सामना पाहेलेला होता यंदा मात्र तिरंगी सामना पाहायला मिळणार असून तिन्हीही तुल्यबळ उमेदवार हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे सांगोल्याच्या या तिरंगी लढतीच्या लढतीमध्ये चुरस निर्माण झालेली आहे.

सांगोला विधानसभा मतदारसंघांमध्ये एकीकडे दोन वेळा आमदार झालेले महायुतीमधील मुख्यमंत्री शिंदे गटाचे उमेदवार शहाजीबापू पाटील तर दुसरीकडे विधानपरिषदेवर निवडून गेलेले माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील तर तिसरे जरी नवखे असले तरी या मतदारसंघातून तब्बल 11 वेळा निवडून गेलेले तत्कालीन आमदार स्व. गगणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख असे तिघेही मातब्बर, तुल्यबळ, वजनदार उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत.

या अटीतटीच्या व चुरशीच्या लढाईमध्ये कोण जिंकणार?आणि कोण हरणार? हे पाहण्याची उत्कंठा सर्वपक्षीय नेतेमंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार या सर्वांनाच लागून राहिलेली आहे.