सर्वात मोठी बातमी! अनंत आणि मुकेश अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मातोश्रीवर नेमकं काय घडतेय?

उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांचे पुत्र अनंत अंबानी हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झाल्याची माहिती समोर आहे. दरम्यान अंबानी पिता-पुत्र ठाकरे यांच्या भेटीसाठी का गेले आहेत याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही.याचबरोबर काही दिवसांत विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. अंबानी पिता-पुत्र उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लावले जात आहेत.

महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सध्या सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. अशात यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेने यासाठी राज्यातील विविध भागांत दौरे सुरू करत प्रचाराला सुरूवात केली आहे.

काही दिवसांपूर्वी ठाकरे यांनी मराठवाडा आणि विदर्भाचा दौरा केला होता. आता ठाकरे पुणे आणि मावळ भागातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत.