विटा येथे मंगळवारी टेंभू योजनेच्या ६ व्या टप्प्याचे भूमिपूजन व बसस्थानक नूतनीकरण कामाचा शुभारंभ शिंदे यांच्या हस्ते झाला. यानंतर झालेल्या शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, खासदार धैर्यशील माने, आमदार शहाजीबापू पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, जिल्हा बॅंकेचे संचालक तानाजी पाटील व अमोल बाबर, जिल्हाप्रमुख आनंदराव पवार उपस्थित होते.
अनिलभाऊंची अपूर्ण काही स्वप्नं असतील ती आता सुहास बाबर यांनी पूर्ण करावीत. तुमच्या सर्वांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभा राहू. अनिलभाऊंची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी एक रुपयाही कमी पडणार नाही. सुहास बाबर यांना पूर्ण ताकद देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.