इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात महायुतीत…..

आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहेत. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे नेते मंडळींची जोरदार तयारी सुरू असलेली पाहायला मिळत आहे. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार प्रकाश आवाडे यांच्या भाजप प्रवेशाने महायुतीत चित्र हे वेगळेच पाहायला मिळत आहे. त्यांच्या या अनपेक्षित घडामोडीने भाजपामधील एक गट नाराजच्या सुरात आहे.

इचलकरंजी मतदारसंघातून जिल्हा शिवसेनाप्रमुख रवींद्र माने यांनी निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी केलेली आहे. मात्र आवाडे यांच्या प्रवेशाने ही जागा भाजपच्या वाटेला जाणार हे निश्चित आहे. डॉ. राहुल आवाडे यांच्या उमेदवारीचा शब्द घेऊनच आवाडे पिता-पुत्रांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे अशी चर्चा इचलकरंजी परिसरात सुरू आहे. त्यामुळे रवींद्र माने यांना कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी मिळणार नाही असे मानले जात आहे. त्यामुळे ते बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत त्यांची बंडखोरी डॉ. राहुल आवाडे यांना अडचणीत आणणारी ठरू शकते हे टाळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत प्रयत्न झाल्यास धोका टळू शकतो.