आमदार आवाडे व हाळवणकर कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र! दोघांमध्ये रंगली जोरदार टोलेबाजी ….

इचलकरंजीतील एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेले आमदार आवाडे व माजी आमदार हाळवणकर आता एकाच पक्षात म्हणजे भाजपमध्ये आहेत. आमदार आवाडे यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पण अद्याप या आजी-माजी आमदारांध्ये फारसे सूर जुळले नसल्याचे चित्र पून्हा दिसले.

बिल्डर्स असोसिएशनच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजप पक्षप्रवेशानंतर आमदार आवाडे व हाळवणकर एकत्र आले होते. यावेळी दोघांमध्ये जोरदार टोलेबाजी रंगली. यापूर्वीही अनेक कार्यक्रमांत एकमेकांवर टोलेबाजी करण्याची संधी दोन्ही नेत्यांनी सोडलेली नाही.आवाडे यांच्या भाजप पक्षप्रवेशानंतर प्रथमच एकाच मंचावर आले. त्यावेळी दोघे काय बोलणार याकडे लक्ष लागले होते. आवाडे व आम्ही आता भाजपमध्ये एकत्र आहोत. त्यांना आम्ही आमच्या पक्षात घेतले आहे. पण पुढे आम्हालाच पक्षातून काढू नका, अशा मोजक्याच शब्दात आवाडे यांच्याकडे पाहत हाळवणकर यांनी चिमटा काढला.

त्यानंतर आवाडे यांनी आपल्या भाषणात या संदर्भाने बरीच मांडणी करतांना आता आपले नेते एकच असून लक्ष्यही एकच असल्यांने हातात हात घालून भाजपच्या माध्यमातून शहराचा विकास करुया, असे नमूद केले.