इचलकरंजी व्हायरल इन्फेक्शन वाढले…

सध्या कडक उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. उन्हाचा तीव्र झळा प्रत्येक नागरिकाला होताना दिसतच आहे. अलीकडच्या काळात उन्हाळा खूपच वाढत आहे. दिवसभर कडक ऊन आणि रात्रीच्या वेळी वारा नसल्यामुळे व्हायरल इन्फेक्शन इचलकरंजी शहरात मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

जसा खोकला, घसा, सर्दी आदी आरोग्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. परिणामी आईजीएम रुग्णालयात उपचारांसाठी रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. नागरिकांनी आरोग्याबाबत दक्षता घ्यावी असा सल्ला दिला आहे.