हुपरी शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर वाढलेला असून भरवस्तीमध्ये, मेन रोड वस्ती तसेच चौका चौकामध्ये, गल्लीबोळामध्ये नागरिकांना ये जा करणे धोक्याचे बनलेले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन विस्कळीत झालेले असून प्रत्येकाच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे. गल्लीबोळात, चौकाचौकांमध्ये भटक्या कुत्र्यांचा उच्छाद वाढलेला असल्यामुळे या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी सध्या जोर धरू लागलेली आहे. जर नगरपरिषदेने अशा भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला नाही तर हुपरी नगरपरिषदेविरुद्ध आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिलेला आहे. तेव्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
Related Posts
हुपरीत तरुणांच्या दोन गटांत हाणामारी!
रंगपंचमी खेळत असताना एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून शनिवारी हुपरी येथील कागलवेस परिसरातील तरुणांच्या दोन गटांत झालेल्या वादावादीचे पर्यवसान दुसऱ्या दिवशी रविवारी…
गुंतवणूकदारांचा हुपरीत पाचव्या दिवशीही ठिय्या
गुंतवणूक केलेल्या पैशाच्या मागणीसाठी येथील ‘त्या’ ठकसेनाच्या दारात गुंतवणूकदारांनी मारलेला ठिय्या आज पाचव्या दिवशीही सुरूच होता.दरम्यान, रक्कम परत मागण्यासाठी त्या…
हुपरीत 3 ऑक्टोंबर ते 12 ऑक्टोंबर दरम्यान नवरात्रउत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन!
आता गुरुवारपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ होणार आहे. यानिमित्ताने हुपरी शहराची कुलस्वामिनी श्री अंबाबाई देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सव सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा…