हुपरी येथील सूर्य तलावात छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याची मागणी

हुपरी येथील सूर्य तलावात छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यास परवानगी द्यावी अशी मागणी हिंदू राष्ट्र समन्वय समितीतर्फे जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकारी अजय नरळे यांच्याकडे करण्यात आली. शहरामधील गट नंबर ८४४ मध्ये सूर्य तलाव असून हुपरी नगरपरिषदेमार्फत त्याचे सुशोभीकरण काम सुरू आहे. आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास युवा पिढीला प्रेरणादायी आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा संपूर्ण इतिहास युवा पिढीला ज्ञात होणे काळाची गरज आहे.

छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा हुपरी येथे उभारण्यात यावा. हुपरी येथील सूर्य तलावाची जागा यासाठी योग्य असून छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी उभारल्यास सूर्य तलावाचे सौंदर्यात अधिकच भर पडणार आहे. तसेच हुपरीवासियांना प्रेरणास्थळ लाभणार आहे. याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी नगर परिषदेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर नितीन काकडे, प्रसाद म्हेतर, सौरभ खोत, संदीप मुधाळे, उम जी लाड, सुनील पाटील, गौरव नेमिष्टे, अभिनंदन माणकापूरे, प्रथमेश कोळी, संतोष महाजन आदींच्या सह्या आहेत. यावेळी मुख्याधिकारी यांनी याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.