राजारामबापूकडून 11 ऑक्टोंबर रोजी सभासदांना मिळणार व्याज; प्रतीक पाटील

राजारामबापू साखर कारखान्याने सहवीज प्रकल्प व विस्तार वाढीसाठी घेतलेली प्रतिटन 147 रुपयांची ठेव दोन टप्प्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना परत केली आहे. या ठेवीवरील तसेच रूपांतरित ठेवीवरील व्याजाची 3 कोटी 44 लाख रुपयांची रक्कम येत्या 11 ऑक्टोबरला ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करीत असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते प्रतीक पाटील यांनी दिलेली आहे.