राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जोरदार इनकमिंग सुरु आहे.. अनेक जण तुतारी हाती घेत आहेत.. तर तुतारी हाती घेऊ इच्छिणा-यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र याचवेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून मोठी घडामोड समोर येतेय.कारण पक्षाचे खासदार अमोल कोल्हेंनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत मोठं विधान केलंय.. जयंत पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मात्र याच जयंत पाटील यांच्याबाबत त्यांच्याच पक्षाचे खासदार अमोल कोल्हेंनी मोठं विधान केलंय.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधलं सर्वोच्च पद जयंत पाटील यांनाच असेल असं विधान अमोल कोल्हेंनी केलंय. त्यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलंय.
जयंत पाटील हे सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत.1999 ते 2008 या काळात जयंत पाटील महाराष्ट्राचे अर्थमंत्री राहिले आहेत. 2008 ते 2009 या काळात जयंत पाटी महाराष्ट्राचे गृहमंत्री राहिले आहेत. त्यानंतर 2009 ते 2014 या काळात जयंत पाटील महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री होते. तर उद्धव ठाकरेंच्या काळात जयंत पाटील जलसंपदा मंत्री होतेराज्याचा सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम जयंत पाटील यांच्या नावावर आहे. विधानसभेत 1990 पासून इस्लामपूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत.