इस्लामपूरमधील अर्धवट विकासकामे पूर्ण मार्गी लागणार

इस्लामपूर पालिकेत प्रशासकीय कारभार सुरू झाल्यामुळे शहरांमध्ये अनेक नियोजित विकास कामे सध्या ठप्प झालेली आहेत. तीन वर्षे पालिकेची पंचवार्षिक निवडणूक झालेली नाही आगामी निवडणूक कधी होणार यावर सर्वांचेच लक्ष केंद्रित झालेले आहे. नूतन राज्य सरकारने नुकतीच पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आणि यामध्ये सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे सोपवले आहे. त्यामुळे इस्लामपुरातील विकासाला गती येईल असे भाजपचे कार्यकर्ते सांगत आहेत. यामुळे इस्लामपूर शहरातील विविध विकासकामे मार्गी लागतील. राजारामबापू पाटील नाट्यगृह नूतनीकरणासाठी निधीही मिळेल अशी चर्चा सध्या सुरू झालेली आहे.