मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याला 9 दिवसांनी परवानगी…..

मनोज जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र नारायण गड येथे दसरा मेळावा घेणार असल्याचे जाहीर केले होते. या दसरा मेळाव्याला परवानगी मिळावी म्हणून 30 सप्टेंबरला शिरुर (कासार) पोलिस ठाण्यात परवानगी मागितली होती.मात्र, आठ दिवस उलटून गेले तरी पोलिसांची परवानगी मिळत नसल्याचे मराठ समाज आक्रमक झाला होता. अखेर आज (बुधवारी) पोलिसांनी दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली आहे.

पोलिसांनी मेळाव्याला परवानगी देत असताना एक दोन नव्हे तर 16 अटी घातल्या आहेत. मेळाव्यात प्रक्षोभक भाषण तसेच दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य करणार नसल्याची देखील अट घालण्यात आली आहे.मनोज जरांगे पाटील यांच्या मेळाव्याला परवानगी मिळणार की नाही, याची उत्सुकता होती. अखेर जरांगे पाटील यांना परवानगी मिळाली. विधानसभा निवडणुकीच्या आधी होणार हा मेळावा महत्त्वाचा मानला जातो आहे. या मेळाव्यातून मनोज जरांगे पाटील आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार का? याची देखील उत्सुकता असणार आहे.