टेंभूच्या सहाव्या टप्प्यात जयंत पाटील यांचा वाटा; बाबासाहेब मुळीक

सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने गणपतीपुळे येथे युवा शिबिर आयोजित केले होते. केवळ जयंतराव पाटील हे जलसंपदामंत्री होते म्हणूनच टेंभू योजनेसाठी ८ टीएमसी व विस्तारित म्हैसाळ योजनेसाठी ६ टीएमसी जादा पाणी उपलब्ध होऊ शकले. त्यामुळे टेंभू योजनेचा ६ वा टप्पा व विस्तारित म्हैसाळ योजनेला मंजुरी मिळू शकली. त्यामुळे टेंभू योजना ६ वा टप्पा व विस्तारित म्हैसाळ योजना मंजुरीत आमदार जयंतराव पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे, असे प्रतिपादन ॲड. बाबासाहेब मुळीक यांनी केले.

सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने गणपतीपुळे येथे आयोजित युवा शिबिरात सांगली जिल्ह्याच्या विकासात राष्ट्रवादी काँग्रेसचे योगदान या विषयावर मार्गदर्शन करताना मुळीक बोलत होते. मुळीक म्हणाले, टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्यात जयंत पाटील यांचे मोठे योगदान लाभले आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, इंद्रजित देशमुख, स्वामीराज भिसे, संजय आवटे, बाळासाहेब नायकवडी, अनिकेत मस्के, यशवंत गोसावी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

अँड. बाबासाहेब मुळीक म्हणाले, जयंतराव पाटील यांनी टेंभू योजनेपासून वंचित खानापूर, आटपाडी, तासगाव तालुक्यातील उर्वरित गावांसाठी ८ टीएमसी व विस्तारित म्हैसाळमधून जत तालुक्यातील उर्वरित गावांसाठी ६ टीएमसी जादा पाणी मंजूर केले. गणपतीपुळे येथे शिबिराचे नियोजन सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी अध्यक्ष विराज नाईक व बाळासाहेब पाटील यांनी केले.