विटा बँकेचा मोठा कार्यक्रम! मात्र अनिलभाऊंची सर्वांनाच आठवण

विटा मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेची 88 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमिळीत संपन्न झाली. बँकेचे मार्गदर्शक स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहून सभेच्या कामकाजास सुरुवात झाली.बँकेचे उपकार्यअध्यक्ष उत्तम बापू यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. सभेचे अध्यक्ष विनोद गुळवणी यांनी या प्रसंगी येणाऱ्या दसरा दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या तसेच बँकेची आर्थिक स्थिती उत्तम होत असल्याचा आनंद तर दुसरीकडे बँकेचे आधारस्तंभ असणाऱ्या स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या अकस्मित दुःखद निधनाने कधीही भरून येणारी पोकळी अशा संमिश्र वातावरणात सभा संपन्न होत असल्याचे सांगितले.

मार्च 2024 या वर्षाची बँकेची वाटचाल निश्चितच सर्वांना ऊर्जा आणि समाधान देणारी आहे. बँकेला निव्वळ नफा तीन कोटी 59 लाख एवढा झालेला असून संचित तोटा 699.62 एवढा शिल्लक राहिलेला आहे. मार्च 2025 या वर्षात सर्व संचीत तोटा कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवून या दृष्टीने वसुली यंत्रणा सक्रिय असल्याचे सांगत विनोदराव गुळवणी यांनी बँकेच्या पुढील उद्दिष्टांबद्दल माहिती दिली. यावेळी अमोलदादा बाबर उत्तम बापू चोखे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.