शिवसेनेचे युवा नेते सुहास बाबर यांचा ट्रेंड …..

महायुती सरकारने गेल्या पाच वर्षाच्या काळात स्वर्गीय आमदार अनिल बाबर यांचा शब्द नेहमीच प्रमाण मानला. अनिलभाऊ यांच्या मागणीप्रमाणे मतदार संघात विक्रमी निधी मिळाला. तसेच आमदार बाबर यांच्या निधनानंतर देखील महायुती सरकारने सुहास बाबर यांना भरघोस पाठबळ दिले. गेल्या सहा महिन्यात कोणतेही पद नसताना सुहास बाबर यांच्या मागणीनुसार मतदार संघाला 1000 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा निधी मिळाला. तर नुकतेच थेट मुख्यमंत्र्यांनीच विटा शहराच्या पाणी योजनेसाठी सह्याद्रीवर बैठक आयोजित करत 87 कोटी रुपयांचा निधी मंजूर करत असल्याचे जाहीर केले. आता सध्या सुहास बाबर यांनी महायुती सरकारकडे मागणी करावी आणि सरकारने ती क्षणाचाही विलंब न लावता मंजूर करावी असा जणू ट्रेंडच निर्माण झाला आहे.

आटपाडी व सांगोला तालुक्याला वरदान ठरणारा राजेवाडी तलाव संपुर्णपणे कोरडा पडलेला आहे. काही गावात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. नुकतीच सुहास बाबर यांनी महापुराचे अतिरिक्त पाणी उरमोडी किंवा जिहे  कठापुर योजनामधून राजेवाडी (म्हसवड) तलावात पाणी सोडावे, अशी मागणी साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे केली.

यासंदर्भात सुहास बाबर यांनी शंभूराजे देसाई यांची भेट घेऊन हे निवेदन दिले व यावर तात्काळ कार्यवाही व्हावी अशी आग्रही मागणी केली. येत्या आठवड्यात पाणी राजेवाडी तलावात येईल अशी ग्वाही शंभूराजे देसाई यांनी दिली.आपल्या दुष्काळी भागाची व्यथा समर्थपणे मांडून महापुराचे पाणी खेचून आणणाऱ्या सुहास बाबर यांचे मतदार संघातून कौतुकाची थाप मिळत आहे.