जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी  कामाला लागा ब्रह्मानंद पडळकर यांचे आवाहन

सांगली जिल्ह्याचे माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी विटा येथे कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केलेली होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नागपूर येथे स्पष्ट केले आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या येत्या तीन महिन्यात जाहीर होतील. त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचा झेंडा जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील पंचायत समितीवर भडकवण्यासाठी खानापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन सांगली जिल्ह्याचे माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मदेव पडळकर यांनी विटा येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना केले.  ते म्हणाले की आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या माध्यमातून खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचा चौफेर विकास करण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टी आणि पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी  गावोगावी पक्षाची संघटन निर्माण करणार आहे.

विटा नगरपरिषद खानापूर नगरपंचायत यासह खानापूर तालुक्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्या निवडणुका भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून स्वबळावर लढण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. आमदार गोपीचंद पडळकर हे राज्याचे नेते आहेत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे सहकारी म्हणून महाराष्ट्र त्यांना ओळखतो त्यामुळे मंत्रीपद मिळाले नाही म्हणून नाराज होऊ नका भारतीय जनता पार्टी ही नेहमीच काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष आहे.

भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित सदस्यता नोंदणी अभियानाचा प्रारंभ समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या हस्ते करण्यात आला. आमदार गोपीचंद पडळकर यांचा राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये समावेश करावा आणि सांगली जिल्ह्याला न्याय द्यावा असा ठराव भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संदीप तात्या ठोंबरे यांनी मांडला याला खानापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी सहमती दर्शवली.