ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भाकितांकडे सर्वांचेच लक्ष्य असते. यापूर्वी त्यांनी लोकसभेला महाविकास आघाडी मोठ्या फरकाने जिंकेल असं भाकित केलं होतं. निकालानंतरचं चित्र राज्यासमोर आहे. आता ही त्यांनी लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज वर्तवला आहे. पवार यांनी महायुतीवर कोरडे ओढले आणि राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी मोठी मुसंडी मारण्याचा दावा केला. काय म्हणाले शरद पवार?
मी सतत महाराष्ट्रात हिंडतोय. इतर सहकारी फिरत आहे. माझं निरीक्षण असं आहे की लोकांना परिवर्तन हवं आहे. लोकसभेच्या निकालाआधी कोणी मान्य करत नव्हतं. पण निकाल आला. आम्ही ३१ जागा जिंकलो याचा अर्थ लोकांना बदल हवा होता. आताही विधानसभेत हा बदल होणार हे नक्की आहे, असा दावा त्यांनी केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा चेहऱ्याबाबत उत्तर दिलं. उत्तर दिलं तेच आमचं उत्तर आहे.