राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते ,त्याआधी आपापली कामे पूर्ण करून घेण्यासाठी जिल्हा परिषद ,जिल्हा नियोजन समिती ,विविध शासकीय कार्यालयात मोठी लगबग सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. आज ,मंगळवारी आचारसंहिता लागू होईल असे गृहीत धरून अनेकांनी कामाचे नियोजन केले आहे .मंत्री, खासदार ,आमदार यांनी शासनाकडून वेगवेगळ्या योजनांमधून मंजूर करून आणलेली निधी , त्याअंतर्गत निविदा ,कार्यारंभ आदेश आचारसंहितेआधी निघावेत यासाठी धावपळ सुरू असल्याचे पाहावयास मिळाले.
जिल्हा नियोजन समिती मधून एकदा का निधी जिल्हा परिषदेकडे आला की तो खर्च करण्यासाठी दोन वर्षाची मुदत असते. त्यामुळे नाविन्यपूर्ण योजना शाळेच्या बांधकामासाठीचा निधी महिला बालकल्याण आणि समाजकल्याण साठी बंधनकारक निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याची प्रक्रिया या आधीच पूर्ण झाली आहे. विभागांनी प्रशासकीय मान्यता दिल्या की ती कामे जिल्हा नियोजन समितीकडे पाठवली जातात .त्यामुळे प्रत्येक शासकीय पातळी लगबग दिसून येत आहे.