आटपाडी तालुक्यात रस्ते विकासासाठी 40 कोटी निधी मंजूर……

आटपाडी तालुक्यातील ग्रामीण भागातील दळणवळण रस्त्यांच्या कामांसाठी अनेक वर्ष निधी प्रतीक्षेत होता. रस्ता कामांचा प्रश्न राहता मार्गी लागलेला आहे त्यामुळे दळणवळणांचा प्रश्न आता मार्गी लागलेला आहे.

आटपाडी तालुक्यातील रस्ते कामांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत तब्बल 40 कोटी निधी मंजूर झालेला आहे. या रस्ते कामांचा प्रारंभ आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. यामध्ये आटपाडी तालुक्यातील झरे ते माने वस्ती, निंबवडे ते वाकसेवाडी, विठ्ठलापुर ते खवसपूर, आटपाडी ते भिवघाट रस्ता, मासाळवाडी ते माडगुळे, लेंगरेवाडी ते चिंदयारी रस्ता, हिवतड काळेवाडी ते तळेवाडी रस्ता, शेंडगेवाडी ते कामत रस्ता विकास कामांसाठी तब्बल 40 कोटी निधी मंजूर झालेला आहे.

याचे लोकार्पण विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. आमदार गोपीचंद पडळकर यांना खानापूर आटपाडी मतदारसंघातील विविध जन सुविधा नागरिक प्रश्न मार्गी लावण्यात यश आले असून त्यांचे प्रत्यक्षात काम सुरू आहे. काही विकास कामांचे काम सुद्धा पूर्ण झालेले आहे.

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर व त्यांचे बंधू माजी जि. प. समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी मतदारसंघातील विविध प्रश्नांसाठी नागरिकांच्या मागणीनुसार प्रश्न सोडवले आहेत.त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.