खासगी क्लासमध्ये शिकणाऱ्या एका ९ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. ही संतापजनक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.श्रीपती भोसले, असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेनं परिसरात संतापाची लाट उसळली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी श्रीपती हा राधानगरी परिसरात खासगी क्लास घेतो. पीडित मुलगी देखील त्याच्याच क्लासमध्ये शिक्षण घेते.
जुलै महिन्यापासून आरोपी हा पीडितेचे लैंगिक शोषण करत होता. पीडितेला एका खोलीत नेऊन तो तिच्यावर अत्याचार करायचा. याबाबत कुणालाही सांगितल्यास पीडितेला जीवे मारण्याची धमकी देखील द्यायचा.आरोपीचे कृत्य वाढतच असल्याने पीडिता प्रचंड घाबरली होती. ती ट्युशनला जाण्यास नकार देत होती. आईने तिला याबाबत कारण विचारले असताना घडलेला सर्व प्रकार पीडितेने आईसमोर कथन केला.
मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे कळताच पीडितेच्या आईने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीला अटक केली.