विट्याच्या तिन्ही पाणी योजना युती सरकारच्या; सुहासभैया बाबर

विटा शहराच्या 88 कोटी 11 लाख रुपयांच्या सुधारित नळ पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहासभैया बाबर नगरसेवक अमोल बाबर विटा नगरपालिकेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी विक्रम सिंह बांदल, मुख्याधिकारी विक्रम पाटील यांच्यासह शहरातील ज्येष्ठ व मान्यवर मंडळींच्या हस्ते पार पडला.

विटा शहरासाठी आतापर्यंत झालेल्या 1995 आणि 2024 दोन्ही योजना या युती सरकारमुळे झालेले आहेत आणि मध्यंतरीच्या काळातही जे 32 कोटी दिले तेही युतीनेच दिले. शहराला तिन्ही पाणी योजना आपल्या सरकारने दिले आहेत. नव्या योजनेच्या प्रत्येक टप्प्यावर लोकांना माहिती देऊन पारदर्शक कामकाज करण्याचा प्रयत्न आपण करतोय असे प्रतिपादन यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहासभैया बाबर यांनी केले.

तर शहरासाठी प्रस्तावित सोलर प्लॅन्ट तयार करून पूर्ण पाणीपुरवठा योजनेचा खर्च त्या सोलर प्लॅन्ट मधून काढायचा आणि शहरवासीयांना पाणीपट्टी सुद्धा भरायला लागू नये इथपर्यंत आपण काम करू अशी ग्वाही नगरसेवक अमोल बाबर यांनी दिली.