मविआतील इच्छुकांची वाढली धाकधूक! इचलकरंजी मतदारसंघात…….

विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक जागा काँग्रेसकडे जाणार असल्याची शक्यता आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांनी यापूर्वीच जागा आणि उमेदवार अदलाबदलीचे संकेत दिल्यानंतर दहा विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील दहापैकी सहा विधानसभा मतदारसंघ हे काँग्रेसला जाणार असल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटातील एकेक जागा कमी होणार आहे. दोघांनाही प्रत्येक दोन जागा आणि काँग्रेसला सहा जागा जाणार असल्याने राधानगरी, शिरोळ आणि इचलकरंजी विधानसभा मतदार संघातील इच्छुक बुचकुळ्यात पडले आहेत.

विद्यमान चार जागा काँग्रेसकडे राहणार असल्याने राधानगरी शिरोळ, इचलकरंजी यातील दोन जागा या काँग्रेसला जाणार आहेत.इचलकरंजी विधानसभा मतदार संघात काँग्रेसकडून हालचाली केल्या जात आहेत. येत्या दोन ते तीन दिवसात हे चित्र स्पष्ट होईल. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज निवडणुकीची तारीख जाहीर होणार आहे. प्रचारापासून ते निवडणुकीच्या निकालापर्यंत उमेदवारांना केवळ 30 दिवसच मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत आघाडीतील मधील काही जागावाटप आणि उमेदवार निश्चिती अद्याप झालेली नाही.