हाळवणकर यांच्या भूमिकेकडे लक्ष…….

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून महायुतीमध्ये अनेकांची विधानसभा निवडणूक लढवण्याची भावना जागृत झाली आहे. हा मतदारसंघ भाजपला जाण्याची शक्यता असल्याने माजी आमदार सुरेश हाळवणकर आणि आमदार प्रकाश आवाडे यांच्यात चढाओढ निर्माण झाली आहे.

आमदार आवाडे यांचे राजकीय कट्टर विरोधक म्हणून माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्याकडे पाहिले जाते. विधानसभा निवडणुकीला तेही इच्छुक आहेत. त्यांनीही भाजपकडे उमेदवारीची मागणी केली आहे.

मात्र, राहुल आवाडे हे उमेदवारीचा शब्द घेऊन आल्याची माहिती आहे. त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. त्यामुळे आवाडे पिता-पुत्र भाजपमध्ये आल्यास माजी आमदार सुरेश हाळवणकर हे कोणती भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचं असणार आहे.