Kojagiri Purnima 2024 : कोजागिरी पौर्णिमा स्पेशल दुधाचा मसाला कसा बनवायचा माहितीये का?

उद्या कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. कोजागिरी पौर्णिमा घरातील सदस्य, सोसायटी, कॉलनीतील ग्रूप एकत्र साजरी करतात. कोजागिरीला मसाल्याचे दूध पिण्याची परंपरा आहे.मसाल्याचे हे दुध आपल्याला अनेकप्रकारे फायदे मिळवून देणारे आहे.

विविध ड्रायफ्रुट्स आणि स्वादिष्ट मसाल्यांनी बनवलेले मसाले दूध सर्वांसाठी चांगले आहे. पण, दुधासाठी प्रिझरवेटीव्ह्स वापरून केलेला मसाला आणू नका. तर, मसाले दुधासाठी घरीच मसाला बनवा. तुम्ही हा मसाला ताजाही वापरू शकता अन् तो साठवूनही ठेऊ शकता. हा मसाला कसा बनवायचा पाहुयात.

साहित्य :

१०० ग्रॅम बदाम, १०० ग्रॅम पिस्ते, १ टे. स्पून वेलची पावडर, १ जायफळ किसून, २५ ग्रॅम चारोळी, २ ग्रॅम केशर.

कृती :

बदाम उकळत्या पाण्यात घालून साल काढून सुकवून मंद आचेवर बदाम, पिस्ते व चारोळी वेगवेगळे भाजून घ्या.

बदाम-पिस्त्याची मिक्सरवर जाडसर पूड करून त्यात वेलदोडे पूड़ जायफळ पूड केशर गरम करून हाताने चुरून मिसळावे.

वरील मिश्रणात चारोळ्या हलक्या कुटून मिसळा किंवा सबंध मिसळा व मसाला घट्ट झाकणाच्या बाटलीत भरा. वरील दुधाचा मसाला भरपूर होतो. खूप प्रमाणात करायचा असेल तर

बदाम, पिस्त्यांबरोबर शंभर ग्रॅम काजूपण घ्यावेत. हा मसाला कोजागिरीचे आटीव दूध, खीर, बासुंदी, श्रीखंड कशातही वापरता येतो.