पीएम मोदींच्या पुण्यातील सभेसाठी पारंपारिक पद्धतीने आमंत्रण…

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात जोरदार प्रचार सभा होत आहेत. याच अनुषंगाने उद्या पुण्यातील लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ऐतिहासिक सभा होत आहे.या सभेला बारामती, मावळ, शिरूर सह पुणे लोकसभा मतदारसंघातील लोकांची गर्दी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच काल भाजपचे युवा नेते गिरीश खत्री मित्र परिवाराच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी पारंपारिक दवंडीद्वारे पुणेकरांना निमंत्रण देण्यात आले. त्यामुळे याची सध्या जोरदार चर्चा आहे.