सदाशिवराव पाटील यांनी बाबर यांना दिली मिठाई

विटा येथे छत्रपती चौक येथे कार्यरत असणाऱ्या शिवविधीज्ञ को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी शिवविधीज्ञ संस्थेस भेट दिली. यावेळी त्यांच्याबरोबर अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी एक मजेशीर किस्सा घडला. भाजपचे अनिल म. बाबर यांना सदाशिवराव भाऊ पाटील यांनी मिठाई दिली. यावेळी सदाशिवराव भाऊ पाटील यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत मिश्किल टोला हाणला. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. याच्यानंतर सुहासभैया बाबर यांनीही संस्थेस भेट देऊन संस्थेबद्दल माहिती घेतली.