Maharashtra Assembly Election: महायुतीचं जागावाटप ठरलं? कोणता पक्ष किती जागा लढवणार?

राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या घोषणेनंतर आता सर्वांचे लक्ष जागावाटपाकडे लागले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने अद्याप याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही.मात्र आता महायुतीचा जागावाटपाचा फॉर्मुला ठरला असल्याची माहिती समोर आली आहे. यानुसार भाजप सर्वाधिक जागा लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणूकीत भाजप 160 किंवा त्यापेक्षा अधिक जागा लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे.

तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 70 ते 75 जागा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 55-60 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र अजून यावर शिक्कामोर्तब झालेले नाही. विधानसभा निवडणूकीसाठी भाजपची पहिली यादी लवकरचं जाहीर होणार आहे अशी माहिती समोर आली आहे. या यादीत विद्यमान आमदारांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. या यादीत 100 च्या आसपास नावांचा समावेश असण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीनंतर मित्रपक्षांचीही यादी समोर येण्याची शक्यता आहे. त्यानंतर अंतिम जागावाटप पूर्ण झाल्यानंतर सर्वच पक्षांची अंतिम यादी समोर येणार आहे.