भारतमाता ज्ञानपीठ संस्थेच्यावतीने रविवार दि. २४ डिसेंबर रोजी ४२ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत, अशी माहिती संयोजक रघुराज मेटकरी यांनी दिली.
पुढे मेटकरी म्हणाले, सकाळी ९.३० वाजता हणमंत पाटीलव महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबईचे सदस्य प्रा. प्रदीप पाटील यांच्या हस्ते संमेलनाची सुरुवात होणार आहे. यावेळी कवी मुकुंद वलेकर यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होणार आहे. दुसरे सत्र दुपारी ४ वाजता सुरू होणार आहे.
त्याचे उद्घाटन मुख्य अभियंता महावितरण छत्रपती संभाजी नगरचे साहित्यिक डॉ. मुरहरी केळे करणार आहेत.कुलगुरू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ डॉ. प्रकाश महानवर व सहाय्यक संचालक, तंत्रनिकेतन महाराष्ट्र राज्य मुंबई मा. कुंडलिक एडके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तिसरे सत्र रात्री ८.३० वाजता कथाकथन आणि संमेलन समारोप आहे. प्रमुख पाहुणे ईश्वर शेठ जाधव असून प्रा. विश्वनाथ गायकवाड, प्रा. रवींद्र कोकरे, जयवंत आवटे यांचे कथाकथन होणार आहे.
संमेलनात सुप्रसिद्ध साहित्यिक पद्मश्री पु. ल. देशपांडे यांच्या नावाने उत्कृष्ट वाग्मय निर्मितीचे पुरस्कारआणि आदर्श शिक्षक पुरस्कार डॉ. प्रकाश दुकळे, डॉ. संदीप सांगळे, डॉ. संभाजी पाटील, डॉ. देविदास पोटे, प्रा. मुकुंद वलेकर यांना देण्यात येणार आहे. संमेलनास मोठ्या संख्येने रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कार्यवाह योगेश्वर मेटकरी यांनी केले आहे. यावेळी डॉ. ऋषीकेश मेटकरी, वैशाली कोळेकर, अरुण लंगोटे, हर्षवर्धन मेटकरी उपस्थित होते.