महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या प्रभावीशाली ठसा उमटवणाऱ्या मोजक्या नेत्यांमध्ये आवर्जून उल्लेख करावा असं नाव म्हणजे ११ वेळा सांगोल्याचे दिवंगत आमदार गणपतराव देशमुख. अत्यंत साधी राहणी असणारे नेते, अशी त्यांची ओळख. त्यांनी आपल्या कारकिर्दीत कष्टकरी शेतकरी व सर्व सामान्य जनतेसाठी खूप मोठे काम केले आहे. या चित्रपटांमधून त्यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला आहे.
हा चित्रपट येत्या २५ ऑक्टोबर रोजी संपूर्ण देशभरात प्रदर्शित करण्यात येणार आहे या चित्रपटाचे ट्रेलर लॉन्चिंग चा कार्यक्रम आज सांगोला येथे संपूर्ण झाला. यावेळी दिवंगत आम. गणपतराव देशमुख यांच्या पत्नी रतनबाई देशमुख, मुलगी शोभाताई पाटील, मारुतीआबा बनकर बाळासाहेब एरंडे ,उल्हास धायगुडे चित्रपटातील कलाकार घनश्याम दरोडे (छोटा पुढारी),अरबाज शेख, अल्ताफ शेख,निकिता सुखदेव यांच्यासह अन्य कलाकार उपस्थित होते. शेतकरी कामगार पक्ष पश्चिम महाराष्ट्रात रूजवण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला.
गणपतराव आबांना जाऊन आता तीन वर्षे झाली. पण त्यांच्या कामाचा उल्लेख सांगोल्याच्या राजकारणात होत राहतो. एसटीतून फिरणारे आबा आता मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांच्या जीवनावर ‘कर्मयोगी आबासाहेब’ हा सिनेमा येत आहे. या सिनेमात अभिनेता अनिकेत विश्वासराव गणपतराव देशमुख यांची भूमिका साकारणार आहे.