महाराष्ट्रात मविआचा महायुतीला धोबीपछाड!

महाराष्ट्रातला निकालही धक्कादायक लागला आहे. आतापर्यंत मतमोजणीतून आलेल्या निकालानुसार अनेक दिग्गज नेत्यांना या निवडणुकीत धक्का बसताना दिसतोय. विशेष म्हणजे गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये एकहाती सत्ता मिळवणाऱ्या भाजपला मोठा दणका बसलाय. महाराष्ट्रात मविआनं महायुतीला धोबीपछाड केलाय.

महाराष्ट्रात मविआला 30 जागा मिळाल्या आहेत. तर महायुतीला 17 जागांवर यश मिळालंय तर सांगलीत अपक्ष विशाल पाटलांचा विजय झालाय. महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाच्या जनतेने मतदानातून सडेतोड उत्तर दिल्याचं बघायला मिळतंय. 13 जागा जिंकत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरलाय. यंदा राज्यात काँग्रेसची दमदार कामगिरी केलीय.