सांगोला येथे उभारण्यात येणार शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा!

सांगोला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी अश्‍वारूढ शिवशिल्प व्हावे अशी गेल्या अनेक वर्षांपासून शिवप्रेमींची मागणी होती. त्यानुसार सांगोला नगरपरिषदेच्या सहकार्याने व आर्किटेक्ट संकेत शास्त्री यांचे मार्गदर्शनाखाली एक ऐतिहासिक वारसा जपणारे शिवशिल्प उभारण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालय विभागाचे मार्गदर्शनानुसार कोल्हापूर येथील शिल्पकार संताजी चौगुले यांनी भव्य-दिव्य असे शिवशिल्पश  साकारलेले आहे. सर्व शासकीय परवानगी मिळाल्या असून गुरुवार दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्‍वारूढ शिवशिल्प कोल्हापूर ते सांगोला असा जल्लोषपूर्ण वातावरणात येणार असून सांगोला तालुक्यातील हजारो शिवभक्त आपल्या वाहनाच्या ताफ्यांसह सामील होणार आहेत.

दरम्यान, सांगोला तालुक्याच्या हद्दीमध्ये आगमन झाल्यानंतर जुनोनी, हातीद, पाचेगाव खुर्द, कारंडेवाडी, नाझरा मठ इत्यादी ठिकाणी शिवशिल्पाचे भव्य दिव्य असे स्वागत होणार आहे. शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता सांगोला शहरातील अंबिका मंदिर येथून ढोल पथक, लेझीम पथक, टाळपथक, उंट, घोडे, मावळे यांचा समावेश असणारे भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यासाठी सांगोला शहरातील सर्व प्रमुख रस्ते भगवे झेंडे, स्वागत कमानी व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येणार आहे.

सांगोला शहरातील भीमनगर, वाढेगाव नाका, कडलास नाका, वासुद चौक, महात्मा् फुले चौक, नेहरू चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी विविध समाज बांधवांच्यान वतीने शिवशिल्पाचे स्वागत होणार असून मिरवणुकीमध्ये सामील झालेल्या शिवप्रेमीसाठी आपली सेवा देणार आहोत हे शिवशिल्प व शिवतीर्थ साकार होत असताना जेष्ठ मंडळींचे मार्गदर्शन पत्रकार बांधवांचे सहकार्य तसेच बहुजन समाजातील समाज बांधव सामाजिक संघटना यांचे बहुमूल्य सहकार्य लाभलेले आहे. या सर्वांच्या ऋणातून शिवप्रेमी मंडळ कधीही उतराई होऊ शकत नाही शिवशिल्प शिवतीर्थावर विराजमान झाल्यानंतर काही दिवसांमध्ये या शिवतीर्थ लोकार्पण सोहळा होणार असल्याचे शिवप्रेमी मंडळ सांगोला यांच्याकडून सांगण्यात आले.