गणपती चौक ते ज्योतिर्लिंग चौक रस्ता डांबरीकरणास पंधरा लाखाचा निधी उपलब्ध

आष्टा शहरातील विविध विकास कामांसाठी शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी कोट्यावधीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत आष्टा येथील गणपती चौक ते ज्योतिर्लिंग चौक रस्ता डांबरीकरणासाठी पंधरा लाखाचा निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती शिवसेनेचे माजी नगरसेवक वीर कुदळे यांनी दिली. गणपती चौक, तेली गल्ली, कासार गल्ली, ज्योतिर्लिंग चौक परिसरातील अनेक नागरिकांची या रस्त्याचे डांबरीकरण व्हावी, अशी मागणी होती.

शासनाच्या नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत या डांबरी रस्त्यासाठी आता पंधरा लाखाचा निधी उपलब्ध झाला आहे. या परिसरातील नागरिकांच्या देखरेखीखाली या रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम केले जाईल. दर्जा आणि गुणवत्तेबाबत तडजोड केली जाणार नसल्याचे वीर कुदळे यांनी म्हटले आहे.

सदरच्या रस्ता पाहणीवेळी माजी नगरसेवक, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष अमोल पडळकर, तालुका उपप्रमुख दिलीप कुरणे, रवि भागवत, अमोल क्षिरसागर, प्रशांत कोरे, सागर परिट, संजय कोटीवाणी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.