हातकणंगले पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या रियाज युसुफ जमादार (रा. संजयनगर, हेरले) व अशितोष विजय नामे (रा. शिवाजीनगर, कुंभोज) या दोन रेकॉर्ड वरील गुन्हेगारांना कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले असून याबाबतचे आदेश प्रांताधिकारी तथा दंडाधिकारी मौसमी चौगुले यांनी दिले आहेत. पोलिसांनी सांगितले की, यातील रियाज जमादार याच्यावर खून, मारामारी, डिजिटल फलक फाडणे असे गुन्हे दाखल आहेत तर अशितोष नामे याच्यावर चोरी, मारामारी असे गुन्हे दाखल असून त्यांच्या वागण्यात सुधारणा होत नसल्याने पोलिसांनी जिल्हा पोलीस प्रमुख व प्रांताधिकारी यांच्याकडे याबाबतचे प्रस्ताव पाठवले होते. त्यानुसार हि कारवाई केली असल्याचे पोलिस निरिक्षक शरद मोमाणे यांनी दिली.
Related Posts
सोशल मीडियावर मुलीची अश्लील पोस्ट करून बदनामी, युवक जेरबंद
सोशल मीडियावर मुलीची अश्लील पोस्ट करून बदनामी करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली. अनिकेत अंकुश गायकवाड (वय २५) असे आरोपीचे नाव…
इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्तांचे फेसबुक अकाऊंट हॅक
अलीकडच्या काळामध्ये अनेक क्राईमच्या घटना उघडकीस येत आहेत अनेक ऑनलाईनद्वारे फसवणुकीच्या प्रकारांमध्ये खूपच वाढ झालेली देखील आपणाला पाहायला मिळतच आहे.…
हातकणंगले तालुक्यात सर्वे च्या नावाखाली संशयास्पद फिरणारे ताब्यात!
अलीकडच्या काळामध्ये गुन्हेगारी क्षेत्रात खूपच वाढ झालेली पाहायला मिळत आहे. तसेच सांगली जिल्ह्यात देखील चोरट्यांचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. हातकणंगले…