आष्टा पोलीस व नगरपालिकेच्या परवानगीसाठी ‘मारुती’ च्या सभामंडपाचे काम वेटिंगला!

प्रत्येक भागात काही ना काही अडचणी या पहायला मिळतात. सध्याअनेक भागात रस्ते, वाहतूक, पाणीप्रश्न या समस्या सोडविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जात आहे. आष्टा शहराची धार्मिक शहर म्हणून ओळख आहे. या पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये  वर्षावर्षापासून मारुतीचे मंदिर आहे. यापूर्वी या मंदिराचा कायापलट नोकरीस असणाऱ्या पोलीस निरीक्षक सह येथील कर्मचाऱ्यांनी केला आहे. काही पोलीस कर्मचाऱ्यांनी मंदिर बांधण्यासाठी लाखोंची ही देणगी दिली आहे. दरवर्षी हनुमान जयंतीला लोक वर्गणीतून येथे महाप्रसाद वाटप केला जातो. या मारुतीच्या दर्शनासाठी भक्त दर शनिवारी मोठी गर्दी करतात.

तसेच लोकवर्गणीतून मंदिराच्या आवारामध्ये लहान मुलांसाठी घसरगुंडी, पाळणळी, झोपाळा उभे करण्यात आले आहे. तसेच वयोवृद्ध नागरिकांना बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर नगरपालिकेच्या वतीने येथे हाय मोस्ट लॅम्प लावल्यासाठी श्री चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात आला होता यामुळेच हा परिसर खऱ्या अर्थाने उजेडात आला. या मंदिरापुढे सभा मंडप व्हावा यासाठी राजस्थानातील सध्या कामानिमित्त आष्टा येते वास्तविक असलेल्या भक्तांनी एकत्र येऊन स्वखर्चाने सभामंडप उभा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी त्यांनी पत्रा, अँगल मंदिराच्या आवारामध्ये आणले आहेत.

आष्टा पोलिस ठाणे आवारातील मारुती मंदिरासमोर सभामंडप उभा करण्यासाठी भाविकांनी पूर्ण तयारी केली होती परंतु यासाठी नगरपालिका व आष्टा पोलीस परवानगी घ्या मगच येथे सभा मंडप उभा करा असे काहींनी सांगितल्याने आष्टा पोलिस व नगरपालिकेकडे परवानगी भाविकांनी मागितली असता अजुन परवानगी मिळाली नसल्याने सध्या पोलीस स्टेशन पाठीमागील ‘मारुती’ च्या सभामंडपाचे काम थांबले आल्याची चर्चा आष्टा शहरात सुरू आहे.