आचारसंहिता लागू झाल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी गाठीभेटी, दौरे सुरु केले आहेत. महाविकास आघाडीसह महायुतीत जागावाटपासंदर्भातील चर्चा सुरु आहे.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांना वाळवा मतदारसंघात घेरण्यासाठी महायुतीनं प्लॅनिंग सुरु केली आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांना वाळवा मतदारसंघात अजित पवार गटाच्या घड्याळ चिन्हावर उभे करण्याचा महायुतीचा प्लॅन असल्याची चर्चा सुरु आहे.
भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील वाळवा मतदारसंघात अजित पवार यांच्या घड्याळाच्या चिन्हावर जयंत पाटील यांच्या विरोधात राहणार उभे राहण्याची शक्यता वर्तवली जातेय. मुंबईत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची निशिकांत पाटील भेट घेणार आहेत. भेटीनंतर वाळवा मतदारसंघात अजित पवार गटांकडून निशिकांत पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जातेय.