वाळवा तालुक्यातील किल्लेमच्छिंद्रगड गावपातळीवर असलेल्या शासकिय जमिनीवर पुर्णतः अतिक्रमणे झाली आहेत. एका गावाने तर संपूर्ण शासकिय जमिनीवर घरे, जनावरांचे गोठे, बंगले बांधून प्रशासकीय व्यवस्थेलाच खुले आव्हान दिले आहे.आश्चर्याची गोष्ट म्हणजे अतिक्रमण करणाऱ्या संबंधित कुटुंबीयांना शासकिय निधीतून रस्ते, पाणी आदि मुलभत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सध्या या गावच्या अतिक्रमणाचा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे.
शासकीय जमिनीवर शेकडो अतिक्रमणे…..
