इचलकरंजी शहरात दिवाळीमध्ये श्री शिवतीर्थ ते महात्मा गांधी पुतळा या मुख्य रस्त्यावर मोठा बाजार भरतो. दोन वर्षांपूर्वी या ठिकाणी एका दुकानात आग लागली. मोठी दुर्घटना घडली होती आग लागलेल्या ठिकाणी आग विझवण्यासाठी अग्निशमन वाहन जाण्यासाठी सुद्धा रस्ता उपलब्ध झालेले नव्हता. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक इचलकरंजी शहर वाहतूक नियंत्रण शाखा यांचेकडून नियोजन करण्याची मागणी महानगरपालिका प्रशासनाकडे केली होती.
झालेल्या बैठकीमध्ये फटाके विक्री स्टॉल उभारण्यासाठी शहरातील किसनराव आवळे मैदान येथे जागा निश्चित करण्यात आली. तसेच शिवतीर्थ ते महात्मा गांधी पुतळा या मुख्य रस्त्यावर एका बाजूला अकरा फूट रुंदीचे बॅरिकेड्स लावून सदर रस्ता अग्निशमन वाहन व रुग्णवाहिका या अत्यावश्यक वाहतुकीसाठी सुरू ठेवण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.
जर कोणी किसनराव आवळे मैदान व्यतिरिक्त इतर ठिकाणी विनापरवाना फटाके विक्री स्टॉल सुरू करतील त्यांच्यावर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सांगितले.