आष्ट्यासाठी निशिकांत पाटील यांनी दिला कोट्यावधीचा निधी

आष्टा येथे महायुतीचा विजयी संकल्प मेळावा संपन्न झाला. इस्लामपूर मतदार संघात निशिकांत भोसले पाटील यांची विधानसभेची उमेदवारी निश्चित आहे. याबद्दल कसलीही शंका नाही. गत निवडणुकीत आष्टा शहरात कमी पडलो. शहराच्या विकासासाठी निशिकांत पाटील यांनी कोट्यावधीचा निधी दिला असल्याने आता मात्र आष्टा शहरातून निशिकांत पाटील यांना पंधरा हजाराहून अधिक मताधिक्य देऊ, असा विश्वास भाजपा युवा मोर्चाचे वाळवा तालुका अध्यक्ष प्रवीण माने यांनी व्यक्त केला.