हातकणंगलेसह इचलकरंजीला मिळाले पशुवैद्यकीय अधिकारी

हातकणंगले तालुक्यासह इचलकरंजी तालुका पशुवैद्यकीय दवाखान्याअंतर्गत 14 पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. या अंतर्गत सुमारे एक लाख 335 पशु संवर्धन करण्यात येते. यामध्ये असणाऱ्या 14 पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये सेवा पुरवण्यासाठी कर्मचाऱ्यांची वानवा होती. त्यामुळे पशुपालकांना उपचारासाठी इतरात्र खाजगीमध्ये उपचार करून घेण्यासाठी अनाठही खर्च करावा लागत होता.

सध्या हातकणंगले तालुक्यासह इचलकरंजी पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये सहा पशुवैद्यकीय अधिकारी दाखल झाल्याने आता पशुपालकांना उपचारासाठी सोयीचे होणार आहे.