केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने सीटीईटी परीक्षेची तारीख बदलली आहे. अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी ही परीक्षा 15 डिसेंबरला होणार होती. परंतु आता ती 14 डिसेंबरला होणार आहे.एखाद्या शहरातील उमेदवारांची संख्या जास्त असल्यास 15 डिसेंबर रोजी देखील परीक्षा घेतली जाऊ शकते. सीबीएसईने वेबसाइटवरील अधिसूचनेत ही माहिती प्रसिद्ध केली आहे.
सीबीएसईने अधिसूचनेद्वारे दिलेल्या माहितीनुसार, उमेदवारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये 15 डिसेंबर 2024 रोजी स्पर्धा परीक्षा होणार आहेत. त्यामुळे उमेदवारांचे हित लक्षात घेऊन, स्पर्धात्मक परीक्षा 14 डिसेंबर रोजी होणार आहेत.
एखाद्या शहरात उमेदवारांची संख्या जास्त असल्यास 15 डिसेंबरला सीटीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीबीएसईद्वारे 14 डिसेंबरला दोन सत्रात परीक्षा घेतली जाईल. सीटीईटी दोन सत्रात घेण्यात येणार असून सकाळी साडेनऊ ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दोन्ही सत्रातील परीक्षा पार पडणार आहे.