पंजाब रावांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, आज पासून पुढील काही दिवस राज्यात पाऊस सुरूच राहणार आहे. 21 ऑक्टोबर, 22 ऑक्टोबर आणि 23 ऑक्टोबर रोजी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
अर्थातच आज पासून पुढील तीन दिवस राज्यात चांगला मुसळधार पाऊस पडणार असे पंजाबरावांनी स्पष्ट केले आहे. या काळात सायंकाळी आणि रात्रीच्या दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. दिवसभर ऊन पडेल आणि सायंकाळी तसेच रात्री पाऊस पडणार असे पंजाबरावांचे म्हणणे आहे.