मद्यपार्टी करणाऱ्यांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये एप्रिलपासून तर डिसेंबरपर्यंत अनेक दिवस ड्राय डे असणार आहे. या दिवशी दारुच्या दुकाने बंद राहणार आहोत. म्हणजेच या दिवशी दारु विक्रीवर बंदी असेल. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यावर उत्पादन शुल्क विभागाचे पथक कारवाई देखील करेल. चला तर मग जाणून घेऊया येत्या 14 एप्रिलपासून ते डिसेंबरपर्यंत किती आणि कोणकोणत्या दिवशी ड्राय डे राहील.
एप्रिल मध्ये 4 दिवस
9 एप्रिल- हिंदू नववर्ष, नवरात्रीचा पहिला दिवस
14 एप्रिल, शनिवार: आंबेडकर जयंती
17 एप्रिल, बुधवार: राम नवमी
21 एप्रिल, रविवार: महावीर जयंती
मे मध्ये 1 दिवस
1 मे, सोमवार: महाराष्ट्र दिन (फक्त महाराष्ट्रात)
जुलै मध्ये 2 दिवस
17 जुलै, बुधवार: मोहरम आणि आषाढी एकादशी
21 जुलै, रविवार: गुरु पौर्णिमा
ऑगस्ट मध्ये 2 दिवस
15 ऑगस्ट, बुधवार: स्वातंत्र्य दिन
26 ऑगस्ट, सोमवार: जन्माष्टमी
सप्टेंबर मध्ये 2 दिवस
7 सप्टेंबर, शनिवार: गणेश चतुर्थी (फक्त महाराष्ट्रात)
17 सप्टेंबर, मंगळवार: ईद-ए-मिलाद आणि अनंत चतुर्दशी
ऑक्टोबर मध्ये 4 दिवस
2 ऑक्टोबर, मंगळवार: गांधी जयंती
8 ऑक्टोबर, सोमवार: दारूबंदी सप्ताह (फक्त महाराष्ट्रात)
12 ऑक्टोबर, शनिवार: दसरा
17 ऑक्टोबर, गुरुवार: महर्षी वाल्मिकी जयंती
नोव्हेंबरमध्ये 3 दिवस
1 नोव्हेंबर, शुक्रवार: दिवाळी
12 नोव्हेंबर, मंगळवार: कार्तिकी एकादशी
15 नोव्हेंबर, शुक्रवार: गुरु नानक जयंती
डिसेंबर मध्ये 1 दिवस
25 डिसेंबर, मंगळवार: ख्रिसमस
ड्राय डे काय असतो?
ड्राय डे एक असा दिवस किंवा तारीख असते. ज्या दिवशी सरकारी दुकान, क्लब, बार आदींमध्ये दारु विक्रीवर बंदी असते. हा एक सणाचा किंवा निवडणुकीचा दिवस असू शकतो. नॅशनल हॉलिडेसारख्या 26 जानेवारी, 15 ऑगस्ट , 2 ऑक्टोबरसह सणांच्या दिवशी निवडणुकांच्या निमित्ताने ड्रायडे असतो. आता येत्या निवडणुकांमध्ये देखील विविध राज्यांमध्ये विविध दिवशी ड्राय डे असू शकतो.