हिवाळ्याच्या (Winter Special ladoo Recipe) दिवसात अनेकांच्या घरात मेथीचे लाडू खाल्ले जातात. हे लाडू खाल्ल्याने वर्षभर आजारपण दूर राहण्यास मदत होते कारण यातील पोषक घटकांमुळे इम्यूनिटी वाढते, हाडं सुद्धा मजबूत राहतात.
मेथीचे लाडू कडू लागतात म्हणून अनेकजण हे लाडू खाणं टाळतात. (How to Make Methi Laddu in Marathi) पण लाडू करण्याची परफेक्ट ट्रिक वापरली तर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण हे लाडू आवडीने खातील. पौष्टीक मेथीचे लाडू करण्याची सोपी रेसिपी पाहूया.
मेथीचे लाडू करण्याची सोपी रेसिपी (How to make Methi ladoo in Marathi)१) मेथीचे लाडू करण्यासाठी अर्धा कप मेथीचे दाणे मिक्सरमध्ये घालून जाडसर पावडर तयार करून घ्या. जास्त बारीक पावडर करू नका. ही मेथीची पावडर एका वाटीत काढून घ्या. त्यात थोडं थोडं करून एक कप दूध घाला. दूध जास्त गरम किंवा थंड असू नये रूम टेम्परेचरवर असावे. मेथी दूध शोषून घेईल त्यासाठी दूध काहीवेळ बाजूला ठेवून द्या.२) कढईत साजूक तूप घालून त्यात एक वाटी बदाम, एक वाटी काजू आणि एक वाटी पिस्त्याचे काप, अर्धा कप अक्रोड, एक कप मखाणे मंद आचेवर तळून घ्या. त्यात अजून थोडं तूप घालून १ वाटी डिंग फुलेपर्यंत तळून घ्या. मंद आचेवर डिंक तळून घ्या. त्यानंतर सुक्या नारळाचा किस तुपात भाजून घ्या. खोबऱ्याचा किस गुलाबी झाल्यानंतर एका ताटात काढून घ्या.
३) कढईत पुन्हा १ कप तूप घालून त्यात दीड कप गव्हाचे पीठ घाला. मंद आचेवर गव्हाचे पीठ भाजून घ्या. पीठ एकदम मोकळं परतवून घेतल्यानंतर त्यात खरबुजाच्या बिया घाला. यात अजून थोडं तूप घालून पुन्हा पीठ वास येईपर्यंत परतवून घ्या.४) मिक्सरच्या भांड्यात सर्व ड्रायफ्रुट्स, डिंक आणि मखाणे घालून एक जाडसर पावडर तयार करून घ्या. ड्रायफ्रुट्स बारीक केल्यानंतर मेथीच्या दाण्याची पेस्ट चमच्याने हलवून घ्या. तव्यात १ चमचा तूप गरम करून मेथीच्या दाण्यांची पेस्ट मंद आचेवर मॉईश्चर निघेपर्यंत भाजून घ्या. मेथी तुपात एकजीव झाल्यानंतर पुन्हा मिक्सरमधून फिरवून घ्या.५) गव्हाच्या पिठाच्या मिश्रणात मेथीची बारीक केलेली पेस्ट घाला आणि व्यवस्थित मिसळून घ्या. त्यात ड्रायफ्रुट्सची पावडर घालून सर्व जिन्नस एकजीव करून घ्या.
६) गुळाचा पाक तयार करण्यासाठी एका कढईत तूप गरम करून त्यात गुळ वितळवण्यासाठी ठेवा. हे लाडू करण्यासाठी चिक्कीचा गूळ वापरू नका. अन्यथा लाडू कडक होतील. हे लाडू जितके मऊ-रवाळ असतात तितकेच चांगले लागतात.
७) गूळाच्या पाकात १ चमचा वेलची पावडर घाला. गूळाचा घट्ट पाक लाडूच्या मिश्रणात घालून चमच्याने एकजीव करून घ्या. मिश्रण थोडं थंड झाल्यानंतर मध्यम आकाराचे लाडू वळून घ्या. हे लाडू तुम्ही हवाबंद डब्यात ठेवून १ ते २ महिने खाऊ शकता.