Jio recharge : मुकेश अंबानींची ग्राहकांना दिवाळी भेट; 101 रुपयांच्या रिचार्जवर अनलिमिटेड 5G Data

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या सातत्याने नवीन ऑफर्स लाँच करत असतात. रिलायन्स जिओनेदेखील दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एक दमदार रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड डेटा मिळेल.ज्या व्यक्ती रोज इंटरनेटचा जास्त वापर करतात, त्यांच्यासाठी हा प्लॅन फायदेशीर ठरणार आहे. रिलायन्स जिओच्या नवीन अनलिमिटेड डेटा प्लॅनबाबत सविस्तर जाणून घेऊ या.

रिलायन्स जिओच्या 101 रुपयांच्या प्लॅनची स्पर्धा एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया यांसारख्या टेलिकॉम कंपन्यांशी आहे. या 101 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहक अनलिमिटेड 5G डेटा वापरू शकतात. ज्या युझर्सच्या परिसरात 5G नेटवर्क कनेक्टिव्हिटी आहे, तेच युझर्स अनलिमिटेड 5G डेटा वापरू शकतात. प्लॅनमध्ये 101 रुपयांत 4G कनेक्टिव्हिटीसह 6GB डेटा दिला जात आहे. हा ट्रू अनलिमिटेड अपग्रेड प्लॅन असल्याने तुम्हाला हा प्लॅन ठरावीक रिचार्ज प्लॅनसोबत वापरता येईल.

यासाठी 1.5GB प्रति दिवस डेटा देणाऱ्या प्लॅनसोबत तुम्हाला हा प्लॅन रिचार्ज करावा लागेल. ज्या प्लॅनमध्ये रोज 1.5GB डेटा मिळतो. त्याची वैधता सुमारे दोन महिने आहे, त्या प्लॅनसोबत तुम्ही 101 रुपयांच्या प्लॅनने रिचार्ज करू शकता. जर तुमच्या परिसरात 5G कनेक्टिव्हिटी असेल तर तुम्ही अनलिमिटेड 5G डेटा वापरू शकता.